शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती येथे संविधान दिन साजरा - Shramik News

Breaking

Tuesday, November 26, 2024

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती येथे संविधान दिन साजरा


 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती येथे आज 26 नोव्हेंबर मंगळवार रोजी संविधान दिनानिमित्त परिपाठात संविधान वाचन मोठ्या उत्साहात  करण्यात आले या दिवशी घर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा संविधान लेखन स्पर्धा  आयोजित करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून संविधानाचे लेखन करून घेण्यात आले श्री ज्ञानेश्वर वाकचौरे सर यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संविधानाबद्दल माहिती विद्यार्थ्यांना श्री.महेंद्र निकम व मनिषा जाधव यांनी सांगितली आणि  तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

Pages