संपूर्ण नरोडे परिवार आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे असून आमचा त्यांना खंबीर पाठींबा - Shramik News

Breaking

Thursday, November 14, 2024

संपूर्ण नरोडे परिवार आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे असून आमचा त्यांना खंबीर पाठींबा


 कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासाला दिशा देवून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला हे कोपरगाव शहरातील महिला भगिनींच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेत्याला येणाऱ्या विधनासभा निवडणुकीत त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील आम्ही संपूर्ण नरोडे परिवार आ. आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे असून आमचा त्यांना खंबीर पाठींबा असल्याचे मनोज नरोडे यांनी सांगितले.

 कोपरगाव शहरात नरोडे पाटील परिवार एक मोठा परिवार म्हणून या परिवाराकडे पाहिले जाते. या नरोडे परिवाराची नुकतीच आ. आशुतोष काळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नरोडे परिवाराच्या वतीने आ.आशुतोष काळे यांचा सत्कार करून सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. येत्या काळात आ.आशुतोष काळे यांना नरोडे परिवार पूर्णपणे समर्थन करणार असून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका तुकाराम नरोडे यांनी स्पष्ट केली आहे. संपूर्ण नरोडे परिवाराने आ.आशुतोष काळे यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक करून नरोडे परिवाराचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहणार असल्याचे सांगत यापेक्षाही जास्त मतदार संघाचा आणि कोपरगाव शहराचा आपल्या हातून विकास व्हावा व आपल्या कोपरगाव मतदार संघाचे नाव विकासाच्या बाबतीत जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या पटलावर झळकावे अशा शब्दात आ.आशुतोष काळे यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी पांडुरंग (तात्या) नरोडेतुकाराम नरोडेदिलीप नरोडेबाळासाहेब नरोडेसुनील नरोडे,अरविंद नरोडे,सुधाकर नरोडेसुरेश नरोडेप्रकाश नरोडे,सुधा तात्या नरोडेराजेंद्र नरोडेमधुकर नरोडेडॉ.विजय नरोडे,दत्तात्रय नरोडे,विजू नाना नरोडेभीमाशंकर नरोडेअशोक नरोडेसंजय नरोडे,अनिल नरोडेगणपत नरोडे,संतोष नरोडे,विनोद नरोडेमनिल नरोडेसंकेत नरोडे,सागर नरोडे,भूषण नरोडे,पंकज नरोडे,राहुल नरोडेअभिषेक नरोडेशशांक नरोडे,शुभम नरोडेमयूर नरोडेसार्थक नरोडेनकुल नरोडे,ऋषी नरोडे,डॉ सागर नरोडेडॉ. भरत नरोडेमहेश नरोडेदिपू नरोडे,मोहित नरोडे,रोहित नरोडे,ऋतुराज नरोडे,कृष्णा नरोडे,ऋषिकेश नरोडेचेतक नरोडेगौरव नरोडेसंदिप नरोडे आदी उपस्थित होते.

Pages