श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 31 डिसेंबर 2024
कोपरगाव :- समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडवून त्या घटकांसोबत कौटुंबिक नाते निर्माण करणार सर्वसामन्यांचा जननेता म्हणजे सुनील देवकर आहे असे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी सुनील देवकर यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना गौरवोद्वार काढले.
सुनील देवकर यांनी टाकळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या या कामामुळे त्यांना कोल्हे कुटुंबाने पंचायत समिती सदस्य ते सभापती केले. या दरम्यान सुनील देवकर यांनी सर्वच क्षेत्रातील शासकीय अधिकारी,नोकरदार, सर्व सामान्य कुटुंब समाज यांच्याशी कार्यतुन जवळीक साधली. त्यांच्या कामाची चर्चा आजही सर्वत्र होत आहे. सुनील देवकर हे अनुभवी, तरुण, आणि अभ्यासू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
.