श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 29 डिसेंबर 2024
कर्जत -आज कर्जत तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शाखा कर्जत यांची सहविचार सभा संपन्न झाली.या सभेस मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.या सभेत काम करत असताना येणाऱ्या अडचणी,समस्या आणि भविष्यात एकसंघ पणा कशा टिकून राहील याविषयी चर्चा करण्यात आली.या बैठकीसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते सर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.आपल्या न्याय हक्कासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना अहोरात्र झटत आहे.त्यामुळे संघटने सोबत कायम राहणार असून लवकरच तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सभासदांनी ठरविले आहे.
![]() |