श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 27 डिसेंबर 2024
कोपरगाव - शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट देऊन वृक्ष संवर्धनाची चळवळ साई ग्रुपने सुरू केली.आज शिक्षक नेते आनंद खरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर यांच्या हस्ते गुलाब वृक्ष देऊन साजरा करण्यात आला.शिक्षकांनी स्थापन केलेल्या साई ग्रुपचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सुनिल देवकर यांनी सांगितले. या प्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत जेजुरकर,जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकचौरे, सदस्य महेंद्र निकम,सदस्य आशिष पारडे जिल्हा गुरुमाऊली सदिच्छा मंडळ उच्चाधिकार समितीचे महेंद्र विधाते व इतर उपस्थित होते.