![]() |
श्रमिक न्युज सौ.सविता विधाते संपादिका
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील
माध्यमिक विद्यालयात आज बाल आनंद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते ..बाळ आनंद मेळाव्या च्या कार्यक्रमासाठी जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री.भीमराज सोनवणे सर कार्याध्यक्ष श्री.निवृत्ती बनकर सचिव श्री.जगन राव आहेर उपाध्यक्ष श्री. अरुणराव महाजन संचालक श्री.विठ्ठल आसने श्री.संजय वाकचौर श्री.बाळासाहेब आहेर श्री.पांडुरंग डफाळ श्री.त्रंबक आहेर श्री राजेंद्र बनकर ,मुख्याध्यापिका सुनीता शिंदे, आसने सर, संतोष तांदळे सर, संतोष आहेर सर, शेळके सर, जेजुरकर सर, सचिन सोनवणे,
श्री.बाळासाहेब आसने श्री. कारभारी सोनवणे , माजी मुख्याध्यापक श्री आहेर सर सर्व स्टाफ,यांच्या उपस्थितीत..
बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन श्री. निवृत्ती भाऊ बनकर यांनी केले व उपस्थित सर्व पाहुण्यांनी बाल आनंद मेळाव्याचे पाहणी करून खाऊ गल्ली भाजीपाला व छोटे छोटे खेळणी या स्टॉल ला भेट देऊन आनंद लुटला विद्यार्थ्यांकडून खाण्याचे पदार्थ घेऊन विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले व व्यवहारिक ज्ञाना विषयी माहिती जाणून घेतली.
त्यानंतर शिक्षण विभागाचे सहाय्यक श्री सोनवणे विवेक सर, कोळपेवाडी कारखान्याचे संचालक, श्री श्रावण आसने, युवा नेते श्री.राहुल सोनवणे सरपंच श्री.अनुराग येवले उपसरपंच ज्ञानदेव जगधने .अशोक बनकर,सुरेश आहेर, कारभारी जगधने, बाळासाहेब गंगावणे,तुकाराम हुळेकर,अमोल आसने,हरिभाऊ आहेर आदी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आनंद मेळाव्याला भेट दिली.
उपस्थित सर्व मान्यवरांचे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जगदंबा शिक्षण मंडळाच्या वतीने आपण अमूल्य खर्च करून मुलांचा आनंद द्विगुणित केल्याबद्द्दल आभार मानन्यात आले.