श्रमिक न्युज सौ सविता विधाते संपादिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर शाळेत शिक्षक व लोकसहभाग यातून 40 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही आठ कॅमेरे उपलब्ध करून शाळेमध्ये बसविण्यात आले सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले सदर कॅमेऱ्यामुळे शाळेतील सुरक्षितता व शिस्त यावर निश्चित परिणाम होईल असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील प्रतिष्ठित व संजीवनी साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव काशिनाथ कदम पाटील यांनी भूषविले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी सीसीटीव्हीचे महत्त्व त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले सदर उद्घाटन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरीक पालक व गावकरी उपस्थित होते सर्वांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी गावातील उपसरपंच ऋषीकेश कदम, संदीप कदम,बाळासाहेब निमसे,साहेबराव लामखडे, भानुदास भुसे, सुनील कदम, आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बाळासाहेब निमसे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.