कोपरगाव - जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी केंद्र स्तर ते जिल्हास्तर अशा पद्धतीने विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. चालू 2024-25 या शैक्षणिक वर्षातील स्पर्धेचे नियोजन येसगाव केंद्रात देखील केंद्रप्रमुख श्री संजय महानुभव यांनी केले होते. या स्पर्धेत लहान गट, मोठा गट, सांस्कृतिक स्पर्धा व वैयक्तिक गटामध्ये किलबिल गट, बालगट, किशोर गट, मोठा गट अशा गटांमध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या. पंच म्हणुन केंद्रातील शिक्षकांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक या सर्वांनी मेहनत घेतली
. येसगाव केंद्राच्या वैयक्तिक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसगाव येथे संपन्न झाल्या तर सांस्कृतिक स्पर्धा लक्ष्मीबाई मंगल कार्यालय येसगाव येथे संपन्न झाल्या. सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. शेवटी सर्वांचे आभार केंद्र मुख्याध्यापिका श्रीमती अलका कदम मॅडम यांनी केले. सर्व विजेत्यांचे अभिनंदन तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी शबाना शेख व केंद्र प्रमुख संजय महानुभव यांनी केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.