केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा जि प प्राथ. शाळा रवंदे येथे नुकत्याच पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे भाऊसाहेब घोटेकर केंद्रप्रमुख बाबासाहेब लांडे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले
केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत केंद्रातील 18 शाळांनी सहभाग नोंदविला होता प्रत्येक वर्गात किलबिल गट बालगट किशोर गट व कुमार गट यानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमध्ये रवंदे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले हस्ताक्षर स्पर्धे त किलबिल गटात तेजल गाडे तृतीय क्रमांक बालगटात मशिरा बागवान तृतीय क्रमांक मिळवला वकृत्व स्पर्धेत किलबिल गटात समृद्धी कदम द्वितीय बाल गटात साची मोरे द्वितीय क्रमांक मिळवला गोष्ट व कथा सादरीकरण यामध्ये श्लोक गाडे प्रथम क्रमांक किशोर गटामध्ये लखन साळवे प्रथम क्रमांक मिळवला वेशभूषा स्पर्धेत किलबिल गटात तनिष्का वाघ तृतीय क्रमांक बाल गटात स्वरांजली कौसे द्वितीय क्रमांक किशोर गटात फतीजा तांबोळी हिने द्वितीय क्रमांक पटकावला सांस्कृतिक स्पर्धेत लहान गटात मोबाईलचे दुष्परिणाम या नाटिकेला द्वितीय क्रमांक मिळाला वैयक्तिक गीत गायनात प्रणव बाविस्कर तृतीय क्रमांक चैतन्य कंक्राळे द्वितीय क्रमांकाने विजयी झाला. समूहगीत गायनात उठा राष्ट्रवीर हो या गाण्याने तृतीय क्रमांक पटकावला विविध स्पर्धेत घवघवीत यश विद्यार्थ्यांनी मिळवल्याबद्दल गावचे सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी मुलांचे कौतुक केले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले