श्रमिक न्युज सौ सविता विधाते संपादिका
कोपरगाव - बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेल्या दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करून या संस्थेद्वारे बौद्धांचे न्याय अधिकार यांचा लढा सुरू केलेला आहे. आज पर्यंत या संस्थेने अनेक समाजशील उपक्रम राबवून समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण केले आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी राजेंद्र घोडेराव यांची निवड उत्तर नगर जिल्हा पालकमंत्री गौरव पवार व जिल्हा महासचिव अशोक बोरुडे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे एक डिसेंबर 2024 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत कोपरगाव तालुकाध्यक्ष विश्वास जमधडे व कोपरगाव तालुका महासचिव बाळासाहेब खाजेकर यांनी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.