कोपरगाव प्रतिनिधी - आज दि. २१/१२/२०२४ रोजी जि. प. प्रा. शाळा खिर्डीगणेश येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बाल आनंद मेळावे आयोजित केले जातात.त्यानुसार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिर्डी गणेश शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता.
यावेळी गावचे सरपंच व उपसरपंच ,सदस्य, पालक, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्था पन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश नामदेव काळे, व इतर सदस्य उपस्थित होते यावेळी मुख्या. पुनीत पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले आणि नंतर आभार मानले.