कोपरगाव प्रतिनिधी - याबाबत सविस्तर वृत्त असे की,सम्यक फाउडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ यांच्या वतीने नुकतेच मुख्यमंत्री युवा कोशल्य योजनेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणार्या युवक युवतींना शासनाने कायम सेवेत घ्यावे यासाठी तहसीलदार. यांना निवेदन दिले आहे.शहरातील विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरूवात करण्यात आली होती.या प्रसंगी निवेदनकर्त्ये म्हणाले की, मुख्यमंत्री युवा कोशल्य योजनेत प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यासाठी विविध विभागात संगणक चालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. परंतु सहा महिने संपल्यानंतर आम्ही काय काम करावे? कुठे काम करावे हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी सध्या कुठलेच मार्गदर्शन शासनाकडून आम्हाला मिळालेले नाही. म्हणून आम्हाला सध्या कार्यरत असलेल्या पदावर आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी.
सम्यक फाउंडेशन प्रणित मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने शुक्रवार दि. 1 9/12/2024 रोजी सदरचे निवेदन. नायब तहसीलदार प्रफुल्लिता .सातपुते यांना दिले आहे याप्रसंगी सौ सविता विधाते राज्य समन्वयक,सुभाष सोनवणे राज्य समन्वयक, सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना,विशाल कोळपे कोपरगाव समन्वयक,दिपक कोळपे, कोपरगाव समन्वयक, गोकुळ मिसाळ कोपरगाव समन्वयक,अमृता कोळगे,पायमोडे त्रिवेणी, भवर तृप्ती,भाग्यश्री ढेपले,पटेल हिना, प्रविण टुपके,अमोल शिंदे सचित संवत्सरकर कोपरगाव समन्वयक कृष्णा चव्हाण
आदी प्रशिक्षणार्थी हजर होते.