विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणारे व्यासपीठ - शबाना शेख - Shramik News

Breaking

Wednesday, January 1, 2025

विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणारे व्यासपीठ - शबाना शेख


 

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका 

कोपरगाव - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळत असते. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणारे व्यासपीठ आहे असे कोपरगाव तालुका गट शिक्षण अधिकारी  शबाना शेख  यांनी स्पर्धेचे उद्घाटन करताना म्हटले. जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती कोपरगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन कोपरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप दळवी, शिक्षण विस्तार अधिकारी शेवंता पुजारी, केंद्रप्रमुख विलास भांड,बाबाजी इरोळे, रावसाहेब लांडे, संजय महानुभव, भारती शेळके, येसगाव केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापिका अलका कदम आदी उपस्थित होते. 



तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन येसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभव व केंद्रतील सर्व शिक्षकांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभव यांनी केले तर आभार प्रदर्शन ओगदी शाळेचे मुख्याध्यापक सुनील टोरपे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली रसाळ आणि सुनिता राऊत यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी येसगाव केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Pages