श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका
कोपरगाव - जिल्हा परिषद शाळा बहादरपूर या शाळेने येसगाव येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये दिमाखदार कामगिरी केली.शाळेने सातत्याने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .यावर्षीच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये शाळेने आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे .या स्पर्धेमध्ये सुमारे सहा प्रथम क्रमांक ,तीन द्वितीय व एक तृतीय क्रमांक असे एकूण दहा पारितोषिक मिळवून शाळेने आपला दबदबा कायम ठेवला आहे. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये मोठ्या गटात सलग तिसऱ्या वर्षी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली.त्याचप्रमाणे वैयक्तिक स्पर्धेत हस्ताक्षर स्पर्धेत सोहम पोपट कुडके प्रथम क्रमांक तर श्रद्धा शंकर रहाणे तृतीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेमध्ये कल्याणी शिवाजी राहणे प्रथम क्रमांक तर सिद्धी सचिन रहाणे द्वितीय क्रमांक,गोष्ट कथा सादरीकरण स्पर्धेमध्ये आराध्या सागर रहाणे व प्रियांका विठ्ठल रहाणे प्रथम क्रमांक तर अर्पिता शिवाजी रहाणे तृतीय क्रमांक, वेशभूषेनुसार सादरीकरण श्रीशा शरद आहेर प्रथम क्रमांक आरुष शरद आहेर.सर्व विजेत्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,सरपंच व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.