श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 12 जानेवारी 2025
कोपरगाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेतील ५ वी इयत्तेत शिकणारी तनिष्का निवृत्ती नाडेकर हिने विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद अहिल्यानगर (शिक्षण विभाग प्राथ.) आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेच्या
तनिष्का निवृत्ती नाडेकर हिने तीन शब्दांवरून कथा सादर करत प्रथम क्रमांक पटकावला तर संस्कृती साबळे हिने तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेने यशाची पंरपरा कायम राखत शाळेच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांनीना मुख्याध्यापक श्री.सोनवणे ,वर्गशिक्षक कचरे तसेच मोगरे ,माळी ,संतोष पारासुर ,गोडे श्रीमती चौधरी यांनी विशेष मार्गदर्शन केले होते.
या दोन्ही विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव पालक व ग्रामस्थांनी केला.
यशस्वी विद्यार्थ्यांनीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य केंद्रप्रमुख बाबाजी इरोळे , विस्ताराधिकारी पुजारी ,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांनीचे,शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.
सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील चासनळी शाळेचे उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.