श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 4 जानेवारी 2025
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील माध्यमिक विद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा तसेच जगदंबा शिक्षण मंडळाचा 45 वा वर्धापन दिन सोहळा, सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सनदी अधिकारी रवींद्र शिंदे, युवा उद्योजक ज्ञानेश्वर शिंगाडे, प्रवीण ईल्हे हे होते. यावेळी ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी शाळेसाठी पाणी शीतकरण यंत्र दिले. त्याचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराज सोनवणे हे होते. कार्याध्यक्ष निवृत्ती बनकर, उपाध्यक्ष अरुण महाजन, सचिव जगन आहेर, विठ्ठल आसने, संजय वाघचौरे, दिलीप सज्जन, अशोक येवले,चांगदेव आसने, सरपंच अनुराग येवले, बाळासाहेब आहेर, राहुल सोनवणे, सुरेश आहेर, ज्ञानदेव गवारे,पोपट आसने, माजी मुख्याध्यापक आहेर सर, वारुळे सर,माजी शिक्षक शेळके सर, जेजुरकर सर, प्रा. बाबासाहेब बहादुरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्याध्यापक वारुळे सर यांनी विद्यालयाला एक लाख रुपये ठेव पावती देणगी दिली.
यावेळी विद्यालयातील कला क्रीडा हस्तकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. 32 व्या रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. मुख्याध्यापिका सुनिता शिंदे यांनी अहवाल वाचन केले. विजय आसने यांनी प्रास्ताविक केले.संतोष आहेर यांनी सूत्रसंचालन केले, सचिन सोनवणे यांनी अनुमोदन दिले, गोपाल राजपूत यांनी आभार मानले. संतोष तांदळे, सुरेखा तोरणे, रूपाली गाजरे यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले. निशा बनकर, वंदना सोनवणे, अशोक माळी, खुरसने मॅडम मॅडम, गोकुळ आहेर, हरीश सज्जन, साईनाथ आहेर, द्वारका अनुसे, बाळू माळी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.