समता सैनिक दलाचे खडकी येथे शिबीर संपन्न - Shramik News

Breaking

Tuesday, January 28, 2025

समता सैनिक दलाचे खडकी येथे शिबीर संपन्न


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते दिनांक 28 जानेवारी 2025

कोपरगाव - दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा अहमदनगर उत्तर व तालुका शाखा कोपरगाव अंतर्गत खडकी ग्राम शाखा येथे समता सैनिक दल शिबीराचे उद्घाटन प्रजास्त्तक दिनी सकाळी 11.15 मिनिटांनी 25 सैनिकांसोबत  झाले. यावेळी जिल्ह्याचे संरक्षण उपाध्यक्ष ऑफिसर  रवींद्र जगताप, शिबिराचे प्रशिक्षक  मेजर राजरतन थोरात सरचिटणीस पुणे जिल्हा पूर्व  हे हजर होते.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुकाध्यक्ष  विश्वास जमदाडे, जिल्हा संघटक  बनकर , राहता तालुका अध्यक्ष   संदीप   त्रिभुवन , कोपरगाव तालुका सरचिटणीस  बाळासाहेब खाजेकर , तालुका शाखा संरक्षण उपाध्यक्ष अशोक गायकवाड , शहराध्यक्ष आयु राजेंद्र घोडेराव , सैनिक  सीमाताई जगताप, जिल्ह्याच्या  खरे ताई,अमोल पवार शहर सरचटणीस आसाराम कुशर, शहर कोषाध्यक्ष भानुदास त्रिभवन पर्यटन सचिव अनिल पवार,  दिनकर खरे संस्कार प्रमुख मोहन शिरसाट,  सचिव  समाधान बोर्डे, हिशोब तपासणीस  विशाल सपकाळ संघटक   आदी उपस्थित होते.

आलेल्या मान्यवरांचे व शिबिरार्थ्यांचे   आभार खरे ताई यांनी मानले .बाळासाहेब खाजेकर , आसाराम कुशर, रवींद्र जगताप इत्यादी पदाधिकाऱ्यांनी   नवीन शिबिरार्थिना शुभेच्छा दिल्या.

Pages