हिंगणीच्या आदिवासी बाधवांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश " अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांची समस्या सुटली " - Shramik News

Breaking

Tuesday, January 28, 2025

हिंगणीच्या आदिवासी बाधवांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी,युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश " अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांची समस्या सुटली "


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 28 जानेवारी 2025

कोपरगांव: दि. २८ जानेवारी २०२५ - वार्ताहर-


तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजिवीकेसाठी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून वनविभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोटखराबा उल्लेख असल्यांने राष्ट्रीयकृत बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थीक सहाय मिळविण्यांत अडचणी येत होत्या त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी या समस्येचा पाठपुरावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यांने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे.

             हिंगणी येथील आदिवासी बांधवांना मिळालेल्या वन जमिनीची सपाटीकरण त्याचप्रमाणे विद्युत मोटारी आदी बाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले त्यामुळे आदिवासी बांधवांना या जमिनी अनेक वर्षे कसून त्यावर उपजीविका करता आली मात्र सदर जमिनीवर पोट खराब उल्लेख असल्याने त्याची कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळणे कमी बँक स्तरावर सातत्याने अडचणी येत होत्या त्याबाबत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत  याप्रकरणी निर्माण होणा-या अडचणींचा अभ्यास करत त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांच्यापुढे संबंधीत आदिवासी बांधवांमार्फत अपिल दाखल केले होते, त्याचा नुकताच निर्णय होवुन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीवर पोटखराबा असलेला उल्लेख दुरूस्त दिला केला त्यामुळे आता आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडुन पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज, आर्थीक सहाय आदि लाभ घेता येणार आहे. या कामी कै. शांताराम चंदू बर्डे या आदिवासी लाभार्थ्यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व त्यानंतर बिपीनदादा कोल्हे यांच्यामार्फत सतत पाठपुरावा केला.

           याबददल सर्व आदिवासी बांधवांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहे.

            याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विश्वासराव महाले, मनेष गाडे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब धर्मा पवार, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, रामदास शिंदे, दादासाहेब पवार, एडवोकेट प्रभाकर सारजाराम पवार, रामभाऊ किसन चंदनशिव, लक्ष्मण किसन चंदनशिव, आप्पासाहेब धर्मा पवार, छगन दादा पवार, पांडू पुंजा मोरे, चिल्हाजी एकनाथ पवार, संतोष एकनाथ चंदनशिव सुभाष शांताराम बर्डे, दत्तात्रय पुंडलिक पवार, हिराबाई निवृत्ती माळी, दत्तात्रय प्रभाकर पवार, लक्ष्मण सोपान पवार,काकासाहेब भास्कर पवार, त्रिभुवन अण्णासाहेब पवार, सुरेश लक्ष्मण चंदनशिव आदि उपस्थित होते.




Pages