श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 30 जानेवारी 2025
कोपरगाव - सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात कोपरगावचा समावेश करावा अशी लेखी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे तहसीलदार कोपरगाव यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदना त्यांनी म्हटले आहे की कोपरगाव तालुक्याला व शहराला दक्षिण भारताची गंगा म्हणून समजली जाणारी गोदावरी नदी आहे. त्यात दैत्य गुरु शुक्राचार्य, देवयानी, संजीवन विद्या,त्र्यंबकेश्वर मंदिर, साई तपोभूमी, विभांडक ऋषी, शृंगेश्वर ऋषी,कृष्ण मंदिर, नारदाची नारदी या धार्मिक ठिकाणासह राघोबा दादांचा वाडा, जनार्दन स्वामी आश्रम व जंगली महाराज आश्रम, संत रामदासी महाराज इत्यादींमुळे पौराणिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. या धार्मिक व पौराणिक व ऐतिहासिक शहराच्या मधोमध पवित्र गंगा गोदावरी नदी वाहते. वरील सर्व बाबींचा विचार करून व कोपरगावच्या विकासाला चालना मिळावी म्हणून सिंहस्थ कुंभमेळाच्या विकास आराखड्यात कोपरगावचा समावेश करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी केली आहे.