रवंदे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरु - Shramik News

Breaking

Friday, January 31, 2025

रवंदे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरु


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 1 फेब्रुवारी 2025

रवंदे - स्वच्छ सुंदर परिसर तर आरोग्य नांदेल, निरंतर अनेक आजारांचे कारण अस्वच्छता हे असते. याच गोष्टी लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत ने ७०० कुटुंबांना कचराकुंड्यांचे वाटप गावचे सरपंच शोभाताई भवर ,उपसरपंच ऋषिकेश कदम , ग्रामविकास अधिकारी बागले , भाऊसाहेब घोटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

घरातील कचरा परिसरातील केरकचरा यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने घंटागाडी सुद्धा गावात सुरू केली. जो कचरा रस्त्यावर इकडे तिकडे टाकला जात होता, तो आता नियमित प्रत्येकाच्या घरापाशी घंटागाडी जाऊन त्यात कचरा जमा होऊ लागल्याने गावाच्या सुंदरतेत आणखीन भर पडल्याचे दिसते. जमा झालेल्या केरकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ लागला. गावात कचऱ्याची घंटागाडी सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व समजल्यामुळे घराघरात कचरा कुंड्यांचा वापर सुरू झाला. गाव स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होताना दिसत आहे. हिंदू रक्षक ग्रुप चे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी अनेक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Pages