श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 23 जानेवारी 2025
कोपरगाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवस्ती ब्राह्मणगाव येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला .याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व माता पालक या मेळाव्यासाठी उपस्थित होते .मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शोभाताई बनकर होत्या. .माता पालकांचे स्वागत करण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमाचे नियोजन मनीषा जाधव यांनी केले. माता पालकांना संक्रांत सणासाठी वाण देण्यात आले .तसेच निपुण भारत अभियान अंतर्गत आयडिया व्हिडिओज कृती देखील घेण्यात आल्या. माता पालकांचे संगीत खुर्ची,चमचा लिंबू, रांगोळी स्पर्धा , व रस्सीखेच यासारखे खेळ घेण्यात आले .संगीत खुर्ची आणि रस्सीखेच खेळाचा यथेच्छ आनंद माता पालकांनी घेतला. तसेच शैक्षणिक वर्ष 2025 साठी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे आणि माता पालकांचे देखील याप्रसंगी स्वागत करण्यात आले. आणि त्यांना दाखल करून घेण्यात आले. राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त सर्व बालिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर तालुकास्तरावर क्रमांक पटकावणाऱ्या अर्पिता केकान हिचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला . यावेळी माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते. योगिता बनकर,कविता केकाण, कविता सोनवणे, शोभा सांगळे, रत्ना बनकर, लता शिंगाडे,शोभाताई बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैशालीताई मोरे ,प्रियंका बनकर, शोभा सांगळे ,वनिता सोनवणे पूजा सांगळे ,ज्योती इनामके, पुनम विध्वंस ,राधिका पवार, अश्विनी सोनवणे ,कविता सोनवणे, योगिता आसने ,शितल आसने वैशाली पवार ,रतिका अहिरे, सुनीता माळी, छबुबाई माळी ,पद्मा सोनवणे, सुनिता इल्हे,गयाबाई मगर, कविता केकाण, रत्ना बनकर, माया सांगळे, जया केकान ,अश्विनी आहिरे, शशिकला सोनवणे ,सुवर्णा केकान, वैशाली पवार ,रंजना पवार पुष्पा जाधव उषा जाधव योगिता बनकर ,भारती बनकर, रंजना सांगळे, गीता सोनवणे ,कांता केकाण, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीषा जाधव ,महेंद्र निकम व मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी परिश्रम घेतले