कोपरगाव मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करा, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी - Shramik News

Breaking

Friday, January 24, 2025

कोपरगाव मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करा, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 23 जानेवारी 2025

कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी गेले काही वर्षात दरोडा आणि जबरी चोरी सारख्या घटना घडल्या आहेत.यामागे मुख्यतः पोलिस दूरक्षेत्रात नियुक्ती असलेले पोलिस उपस्थिती नसल्याने चोर त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करा अशी मागणी मा. आ.सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन अंकित कोळपेवाडी दुरक्षेत्र आणि वारी पोलिस दूरक्षेत्र,शिर्डी पो.अंकित पोहेगाव दुरक्षेत्र, राहता पो.अंकित पुणतांबा दुरक्षेत्र,श्रीरामपूर तालुका पो.अंकित चितळी दुरक्षेत्र कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.थेट तालुका स्तरावरून पोलिस पाचारण होऊ पर्यंत घटना स्थळावरून गुन्हेगार पलायन करण्यात अनेकदा यशस्वी होतात त्यामुळे वरील मंजूर असणारे दूरक्षेत्रे कार्यान्वित झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.


कोळपेवाडी येथे सन २०१८ मध्ये सुवर्णकार दुकानावर दरोडा पडून व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता त्याच प्रकारे नुकतेच पोहेगाव येथे २१ जानेवारी२०२५ रोजी दिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत असणाऱ्या सुवर्णकार दुकानावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.दरोडे,घरफोड्या,चोऱ्या यांना आळा घालण्यासाठी मतदारसंघातील मंजूर असणारे पोलिस दुरक्षेत्र कार्यान्वित करावे अशी मागणी कोल्हे यांनी नामदार फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.



पोलिस हा समाज व्यवस्थेला सुरळीत आणि भयमुक्त राहण्यासाठी मदत होणारा महत्वाचा घटक आहेत त्यांना दूरक्षेत्रात दिलेली जबाबदारीचे नेटके नियोजन होऊन ही दुरक्षेत्रे कार्यान्वित होणे हा महत्वाचा भाग कायदा आणि सुव्यवस्था जतन करण्यास ठरणार आहे.तरीही या प्रश्नावर नामदार फडणवीस साहेब लक्ष घालून लवकरच तोडगा निघेल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.



Pages