पंचायत समिती कोपरगाव व विज्ञान, गणित अध्यापक संघ यांच्या वतीने जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर येथे आयोजित 52 व्या कोपरगाव तालुका विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024 - 25 चे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी संदिप दळवी, महानंदाचे माजी चेअरमन राजेशआबा परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मधुकर साबळे, चंदुमामा लोखंडे, बाळासाहेब आबक, लक्ष्मणराव साबळे, सरपंच सौ. सुलोचनाताई ढेपले, उपसरपंच विवेक परजणे, औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडितराव भारुड, चंद्रशेखर देशमुख, तुषार बारहाते, अशोक लोहकणे, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, पंडितराव वाघिरे, गटशिक्षण अधिकारी शबाना शेख, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.