रवंदे केंद्राच्या क्रीडा स्पर्था उत्साहात संपन्न - Shramik News

Breaking

Tuesday, January 7, 2025

रवंदे केंद्राच्या क्रीडा स्पर्था उत्साहात संपन्न


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 जानेवारी 2025

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे नुकत्याच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या, स्पर्धेचे उदघाटन रवंदे गावाचे सरपंच श्रीम भवर ताई,  उपसरपंच श्री. ऋषिकेश कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शशिकांत सोनवणे यांच्या  हस्ते करण्यात आले.  केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा रवंदे शाळेत घेण्यात आल्या. केंद्रातील 18 शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, धावणे, कब्बड्डी, खो -खो अशा स्पर्धा उत्साहात घेण्यात आल्या. मुलांना मैदानी खेळाचा विसर पडत चाललाय अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे मुलांमधील खेळाडू वृतीला वाव मिळतो आणि मुले भविष्यात चांगले खेळाडू होऊ शकतात असे मत उदघाटन प्रसंगी उपसरपंच श्री. ऋषिकेश कदम यांनी व्यक्त केले. उपक्रमाचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी केंद्रातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Pages