श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 जानेवारी 2025
कोपरगाव तालुका 52 वे गणित विज्ञान आणि पर्यावरण प्रदर्शन नुकतेच उत्साहात पार पडले यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकर वस्ती ब्राह्मणगावची विद्यार्थिनी अर्पिता बाळासाहेब केकाण हिने इयत्ता पहिली ते पाचवीच्या गणित गटात द्वितीय क्रमांक पटकावला अर्पिता केकाण हिचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तिने निपुण भारत अभियान अंतर्गत टाकाऊतून टिकाऊ गणित साहित्य पेटी हे साहित्य तयार केले होते मूळ संख्या त्रिकोणी संख्या जोडमूळ संख्या संख्यांची छत्री इत्यादी बाबींची माहिती देणारी ही गणित साहित्य पेटी आकर्षणाचा विषय ठरली तिला गणित शिक्षिका मनीषा जाधव व महेंद्र निकम तसेच मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वाकचौरे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या सार्थक विनोद सोनवणे याचा देखील प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तिच्या या यशाबद्दल ब्राह्मण गावचे सरपंच अनुरागभाऊ येवले माजी सरपंच शोभाताई बनकर बाळासाहेब बनकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब केकाण उपाध्यक्ष वैशालीताई मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक गटशिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे आदींनी कौतुक केले आहे.