मैदानी खेळ स्पर्धेततुन ग्रामिण भागातील गुणवंत खेळाडूंना ऑलम्पिक स्पर्धेत संधी मिळेल - संजय महानुभव - Shramik News

Breaking

Tuesday, January 7, 2025

मैदानी खेळ स्पर्धेततुन ग्रामिण भागातील गुणवंत खेळाडूंना ऑलम्पिक स्पर्धेत संधी मिळेल - संजय महानुभव


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 जानेवारी 2025

जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र स्तर,तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.विद्यार्थ्यांच्या खेळ गुणांना वाव मिळण्यासाठी आणि दर्जेदार खेळाडू तयार होणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असुन ग्रामीण भागातील खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेसाठी संधी मिळते असे येसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभव यांनी स्पर्धेच्या उद्घाटन पर प्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्रातील सर्व शाळांचे संघ हजर होते.स्पर्धेच्या मुख्य लेखाधिकारी म्हणून येसगाव केंद्राच्या केंद्र मुख्याध्यापिका अलका कदम यांनी काम पाहिले तर केंद्रातील शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.ज्या संघाचा प्रथम क्रमांक आला आहे त्यांची निवड तालुका स्तरासाठी झाली आहे.सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी शबाना शेख,सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




Pages