श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 28 जानेवारी 2025
कोपरगाव - समृद्धी महामार्ग तयार करताना ज्या ठिकाणाहुन उत्खनन केले त्या ठिकाणी आजही रोड समृद्धी महामार्ग व्यवस्थपणाने तयार करून दिले नाहीत. आजही नागरीकांना दळणवळणाची व्यवस्था परीपुर्ण करून दिली नाही. समृद्धी महामार्ग चालू असताना अनेक अधिकारी यांनी तोंडी आश्वासन देऊन सांगीतले होते. परंतु समृद्धी महामार्ग चालू झाला, वाहतूक सुरळीत चालू झाली, पण हाच समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी यांच्या जमिनी विकत घेऊन उत्खनन करणारे समृद्धी महामार्ग ठेकेदार यांनी आज पावेतो कोणत्याही प्रकारचे शेत शिवार वाहणीचे रस्ते सुरळीत करून दिले नाहीत. ज्या वेळी समृद्धी महामार्ग तयार होणार त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन मसुदा तयार करण्यात येतो. पण लोकप्रतिनिधी यांनी साधी उत्खनन ठिकाणी रोड तयार करून द्या असे सुद्धा रस्ते विभाग भारत सरकार दिल्ली यांना कळविले नाही. कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत करण्यासाठी कोणीही लक्ष वेधून घेत नाही. फक्त ज्यांना दळणवळणाची अडचण येते त्यांनाच हा सामना करावा लागत आहे. याकडे सक्षम नेतृत्व शिल्लक राहिले नाहीत. फक्त राजकीय खोटे आश्वासन आज पावेतो शेतकऱ्यांना पाहायला मिळते आहे. त्यात कोकमठाण गाव हद्दीत सडे कोकमठाण शिव रस्ता या ठिकाणी अर्धवट काम सोडून अर्धवट रस्ता तयार करून आज रोजी समृद्धी महामार्गाने काळी माती वाहतूक विक्री चालू केली आहे.
बेलापूर रोड, कारवाडी, रेलवाडी ते समृद्धी महामार्ग अशी चार किलोमीटर उत्खनन मळी नाला पासून वहातुक केली, तो रोड सुद्धा पुर्ण करून दिला नाही. गावठाण परीसरातुन सुद्धा वाहातुक केली आहे. शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब राऊत यांनी वेळोवेळी मागणी केली आहे परंतु सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने आंदोलन सुरू करणार आहे. आता नाही तर कधीच नाही आता शेतकरी हितासाठी गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेब राऊत यांनी हे पाऊल उचलले आहे. आता समृद्धी महामार्ग ठेकेदार यांना जाग आणण्यासाठी हे आंदोलन करावेच लागणार आहे.
शेतकरी हितासाठी रस्ते सुरळीत करून द्या अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.