वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता शिंदे - Shramik News

Breaking

Tuesday, January 28, 2025

वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता शिंदे


 

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दि. 28 जानेवारी 2025 

कोपरगाव - तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता एकनाथ शिंदे यांची नुकतीच निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी मधुकर पगारे यांनी काम पाहिले. अपक्ष निलेश काळे यांचा पराभव झाला. उपसरपंच सौ सविता शिंदे यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. 

            याप्रसंगी कोल्हे गटाचे सरपंच वैशाली सतिष भोसले, ग्रामपंचायत सदस्य सतिष बोरावेक, दिपक पवार, रोहिणी रावसाहेब मोकळ, अनिता अरूण खुरसणे तर काळे गटाचे गणपत गोरे, संकेत मेहेत्रे, उषा अशोक पवार उपस्थित होते. श्वेता वाल्मीक काटे या सदस्या अनुपस्थित होत्या.

            नवनिर्वाचित उपसरपंच सौ. सविता एकनाथ शिंदे यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. वेळापुर गांव विकासाच्या योजना राबविण्यासाठी काम करू असे सौ. सविता शिंदे म्हणाल्या.

           याप्रसंगी सर्वश्री. सीताराम वाळके,रावसाहेब मोकळ, सचिन गोरे, प्रशांत वाबळे, सतिश भोसले, एकनाथ शिंदे, अरूण खुरसणे, माजी पोलिस उपनिरीक्षक शंकरराव मोकळ, हेमंत पंडोरे, प्रशांत मोकळ आदि उपस्थित होते.

Pages