धारणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बाबासाहेब वाघ यांची निवड - Shramik News

Breaking

Saturday, February 1, 2025

धारणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बाबासाहेब वाघ यांची निवड


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 1 फेब्रुवारी 2025

दोन वर्षांपूर्वी झालेल्या धरणगाव ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व सदस्य निवडून आले होते. रोटेशन पद्धत ठरल्याप्रमाणे मावळते उपसरपंच गणेश थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन उपसरपंच म्हणून श्री बाबासाहेब वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.


 या लोकनियुक्त सरपंच सौ.वरूणा दीपक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.उपरपंच पदासाठी सदस्य अण्णासाहेब रणशूर यांनी बाबासाहेब वाघ यांच्या नावाची सूचना मांडली व माजी उपसरपंच गणेश थोरात यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे श्री.बाबासाहेब वाघ यांची बिनविरोध निवड झाली.


या प्रसंगी मा उपसरपंच गणेश थोरात यांचा सत्कार केला व नवीन उपसरपंच यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश घोडेरा,माजी संचालक दगुराव चौधरी, लोकनियुक्त सरपंच वरूणा दीपक चौधरी,नानासाहेब थोरात,सोपानराव वहाडणे,तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ वहाडणे, सोसायटी संचालक तुकाराम रणशूर, मा उपसरपंच दशरथ मोरे,संदीप चौधरी,दिपक सुरे,ग्रामपंचायत सदस्य, सर्व श्री  संदीप थोरात, सौ कविता संतोष चौधरी, गणेश थोरात,अण्णासाहेब रणशुर,कु मोहिनी विठ्ठल मोरे, सौ माधुरी सुरज रणशूर, सौ.पुष्पा मच्छिंद्र जाधव, सौ सोनल सुदर्शन कुहिटे, ग्राम अधिकारी पूनम अहिरे यांचे सह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Pages