श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 18 फेब्रुवारी 2025
कोपरगाव - जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा होणे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरोदगार कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरगाव ब्रँच शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले .जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबरच संस्कार खेळ यांचे सखोल मार्गदर्शन होते असे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी शंकरराव कोल्हे हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने मानपत्र देऊन माननीय माईसाहेब कोल्हे यांना गौरविण्यात आले.तसेच इतरही वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सकाळ पेपरचे माजी संपादक यमाजी मालकर, मान.माईसाहेब कोल्हे,सौ रेणुका ताई कोल्हे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, येसगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संजय महानुभव,शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव राहणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, सरपंच संदीप देवकर, टीडीपीचे अध्यक्ष अंबादास देवकर, माजी विद्यार्थी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मॅनेजिंग स्टडी बोर्डाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विनोद मालकर, जीएसटी कर निरीक्षक श्रीमती पुनम बारवकर, इंडियन रेल्वे इंजिनिअर विशाल चव्हाण आदीसह माझी आजी विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपाध्यापक श्रीराम तांबे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश कहांडळ यांनी केले. आभार प्रदर्शन सुनिता भालेराव यांनी केले. सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक कैलास गिरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक योगेश भागवत, आशिष पारडे, वैशाली खराडे, प्रियांका काळे, विद्या अभंग यांच्यासह सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पालक व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.