अतिक्रमण मोहिमेची अंमलबजावणी करतांना कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या - आ.आशुतोष काळे - Shramik News

Breaking

Tuesday, February 18, 2025

अतिक्रमण मोहिमेची अंमलबजावणी करतांना कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या - आ.आशुतोष काळे


 

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 18 फेब्रुवारी 2025

कोपरगाव वार्ताहर –कोपरगाव शहरातील अतिक्रमण मोहिमेची अंमलबजावणी करतांना कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने हि अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी व सर्वाना समान न्याय द्यावा. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना  दिल्या आहेत.


न्यायालयाच्या निर्णयानुसार कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेण्यात येणार असून हि अंमलबजावणी करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सोमवार (दि.१७) रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे यांनी बैठक घेवून नगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, नगर रचनाकार आश्विनी पिंगळ, सहाय्यक नगर रचनाकार किरण जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 


यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने शहरातील अतिक्रमण काढतांना कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी.अतिक्रमित असलेल्या भागाची जबाबदारीपूर्वक पाहणी करण्यासाठी नगरपरिषदेने प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.अधिकाऱ्यांच्या मार्फत अतिक्रमित परिसराची फेर मोजणी करावी. सर्व बाबींची पूर्तता करतांना शहरातील सर्वसामान्य नागरिकांना समान न्याय मिळेल याची काळजी घ्यावी. अतिक्रमण मोहीम राबवतांना या कारवाई दरम्यान शासकीय नियमाच्या अधिन राहूनच नगर परिषद प्रशासनाने सदर अतिक्रमण मोहीम राबवावी.अतिक्रमण काढण्याआधी नागरिकांना कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील अतिक्रमण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाला या बैठकीत दिल्या.

Pages