स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अधिवेशनास विज कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे- केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे यांचे आव्हान - Shramik News

Breaking

Friday, February 7, 2025

स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे अधिवेशनास विज कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे- केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे यांचे आव्हान


 

श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 फेब्रुवारी 2025

कोपरगाव - महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी संघटनेचे दुसरे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक 9 रोजी राहीचंद मंगल कार्यालय लातूर येथे महत्वपूर्ण विषयावर अधिवेशन होणार असून यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने वीज कर्मचारी सहभागी होणार आहेत वीज वितरण कंपनीचे कामगारांच्या विविध प्रश्नांना हात घालणार आहेत. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन संपन्न होणार असून उद्घाटन सेवानिवृत्त आयएएस. अधिकारी ई. झेड. खोब्रागडे प्रथम मार्गदर्शन सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कामगार नेते शाम दादा गायकवाड ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत राजू परुळेकर प्रसिद्ध अभिनेता व व्याख्याता किरण माने हे उपस्थित राहणार आहेत.

 या राज्यातील एक दिवशी दिवार्षिक अधिवेशनामध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना सोबत एकूणच भारतीय कामगार चळवळीचा आढावा घेण्यात येणार असून कामगार चळवळीची भविष्यातील दिशा स्पष्ट होण्याच्या दृष्टिकोनातून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 या चर्चासत्रामध्ये  खोब्रागडे हे संविधान अंमलबजावणीतील अडथळे व उपाय शाम दादा गायकवाड श्रमिकांची चळवळ आणि डॉ. बाबासाहेबांची भूमिका तर राजू परुळेकर हे सध्याची सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती आणि बहुजन कामगारांची भूमिका या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनास संघटनेचे केंद्रीय सल्लागार अरुण भालेराव हे वीज कामगारांना पुढील आव्हाने आणि संघटनेची भूमिका या विषयावर आपले मार्गदर्शन देणार आहेत, तर संघटनेचे दुसरे सल्लागार अशोक सोनवणे हे स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेची पुढील वाटचाल या विषयावर आपले मार्गदर्शन वीज कामगारांना करणार आहेत, संबंध दिवसभरातील प्रथम सत्र संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सिद्धार्थ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.

 दुपारच्या सत्रात केंद्रीय कार्याध्यक्ष राजाभाऊ बोंढारे  संघटनेच्या सर्व केंद्रीय तसेच झोन विद्युत केंद्र शाखांचे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधणार आहेत या या अधिवेशनासाठी राज्यभरातून वीज कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी केले आहे.

Pages