श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 7 फेब्रुवारी 2025
रवंदे - पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवंदे येथे दिनांक ७ / २ /२०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रवंदे गावचे उपसरपंच ऋषिकेश कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोनवणे ,डॉक्टर वैजयंती होन, डॉक्टर विक्रम खटकाळे ,डॉक्टर जगताप, डॉक्टर आयनॉर ,सी ई ओ निकम व मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त रमाई भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
प्राथमिक शाळा रवंदे येथील 250 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर वैजयंती होन, डॉक्टर विक्रम खटकाळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना आजार आहेत अशा विद्यार्थ्यांना औषधोपचार केले गंभीर आजाराचे विद्यार्थी यांना रेफर करण्यात आले. सर्दी खोकला आजाराची मुले जास्त होती. कॅल्शियमचे प्रमाण कमी असलेल्या विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या .प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य कार्ड भरण्यात आले. विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याचा कानमंत्र डॉक्टर वैजयंती होन यांनी दिला . शाळेत अल्पोपहार व चहापाण्याची डॉक्टरांची सोय करण्यात आली होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.