24 मार्च प्रेरणा दिनाला चासनळी येथे रक्तदान शिबिर संपन्न - Shramik News

Breaking

Saturday, March 29, 2025

24 मार्च प्रेरणा दिनाला चासनळी येथे रक्तदान शिबिर संपन्न


कोपरगाव - माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त चासनळी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला होता. 24 मार्च हा प्रेरणा दिन म्हणून सबंध कोपरगाव आणि परिसरात साजरा होत असताना येथे रक्तदान शिबिराचा आदर्श उपक्रम घेण्यात आला.


रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस निर्माण होत आहे.जनसामान्यांच्या जीवनात आनंद देणारे स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंतीची प्रेरणा घेत अनेकांनी रक्तदान केले. गरजू रुग्णांना अशा रक्तदान शिबिरातून रक्तपुरवठा झाल्याने जीवनदान मिळत असते. कोल्हे यांच्या स्मरणार्थ मोफत फिरता दवाखाना गावोगावी अनेकांना सेवा देत आहे. आरोग्य सेवा ही सर्वोत्तम मानणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे होणारे आयोजन हे अभिमानास्पद आहे. 


याप्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक मनेश गाडे, अमृत संजीवनी व्हा.चेअरमन राहुल चांदगुडे,चंद्रकांत चांदगुडे,विश्वास गाडे,अशोक आहेर,विनायक गाडे, मनोज गाडे, रवींद्र चांदगुडे,हर्षद गाडे,सुयोग गाडे,कैलास चांदगुडे,सादिक सय्यद,प्रकाश गाडे,कैलास धेनक यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Pages