श्रीरामपूर - तालुक्यातील नायगाव येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ चंद्रसेन रामराव लांडे व माजी उपसरपंच सौ.मिनाताई चंद्रसेन लांडे यांचे सुपुत्र निलेश चंद्रसेन लांडे (रिजनल मॅनेजर वखार महामंडळ लातूर विभाग) यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून मिशन आपुलकी अंतर्गत विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन दातृत्व भावनेतून नायगाव जुने प्राथमिक शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना ६०००/- रुपयांच्या दर्जेदार चप्पलांचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी लांडे परिवाराने विद्यार्थी हिताचा उपक्रम घडवून आणल्याबद्दल कौतुक केले.यावेळी कार्यक्रमात केंद्रप्रमुख राजू इनामदार,केंद्रप्रमुख बाबासाहेब पिलगर,सरपंच डॉ.रा.ना.राशिनकर,माजी उपसरपंच मिनाताई लांडे,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ बाळासाहेब इंगळे,चंद्रसेन लांडे,नायगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनिल लांडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष जालिंदर राशिनकर,मुख्याध्यापक वाघुजी पटारे,यशवंत बागुल,दिपाली पंधारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चप्पलचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्वांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.शेवटी सहशिक्षका सुजाता सोळसे यांनी आभार मानले.
Saturday, March 29, 2025

Home
Ahmednagar
akole
news
नायगाव जुने प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चप्पलचे वाटप. (६,००० रुपयांच्या निधीतून ग्रामस्थ निलेश चंद्रसेन लांडे यांनी जपले आपुलकीचे मिशन