खासदार सुप्रियाताई सुळे यांना शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाचे निवेदन - Shramik News

Breaking

Wednesday, March 26, 2025

खासदार सुप्रियाताई सुळे यांना शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाचे निवेदन


 दिल्ली - शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दर महिन्याला फक्त अडीच हजार रुपये मानधन दिले जाते.शिवाय या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कोणत्याच सुविधा दिली जात नाही.  प्रत्येक राज्यात मानधन वेगवेगळे दिले जाते. हरियाणा राज्यात सात हजार रुपये,मध्य प्रदेश मध्ये 4000 रुपये तर सर्वात कमी महाराष्ट्र राज्यात फक्त 2500 रुपये मानधन दिले जाते.त्यांच्या विविध प्रश्नासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना अहोरात्र काम करत आहे. या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आणि मानधनात केंद्र सरकारचा हिस्सा वाढवून मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना 6 जनपथ रोड नवी दिल्ली येथे संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते सर,राज्य समन्वयक सुभाष सोनवणे,राज्य समन्वय उत्तम गायकवाड,कर्जत तालुका अध्यक्ष सुखदेव कांबळे,जामखेड  तालुका अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर,राजेंद्र वाल्हेकर,मुकुंद सुतार, विकास गिरी,कोपरगाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव झिरपे आदि उपस्थित होते.



Pages