प्रेरणा दिनाला रुग्णांना फळ वाटप आणि शेकडो विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी - Shramik News

Breaking

Thursday, March 27, 2025

प्रेरणा दिनाला रुग्णांना फळ वाटप आणि शेकडो विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी


 कोपरगाव - माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीला २४ मार्च रोजी प्रेरणा दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय कोपरगाव या ठिकाणी परिसर स्वच्छ्ता व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम पदाधिकाऱ्यांनी राबविला.प्रेरणा दिनाचे महत्व अतिशय समर्पक भावनेने जोपासून  विविध पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला.


माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची जयंती ही त्यांनी केलेल्या सामाजिक योगदानाच्या प्रति जाणीव म्हणून प्रेरणा दिनाने साजरी झाली.२४ मार्च हा प्रेरणा दिवस बनला असून कोपरगाव तालुक्यासह परिसरातील असंख्य ठिकाणी हा दिवस वेगळेपणाने सामाजिक कार्यक्रम राबवत साजरा झाला आहे.


आरोग्यसेवेसाठी कोल्हे यांचे योगदान मोठे आहे.त्यांच्या पश्चात मोफत फिरता दवाखाना देखील सुरू असून मूकबधिर विद्यालय,आंबेडकर वसतिगृत,टाकळी आश्रमशाळा यासाठी असंख्य ठिकाणी मोफत आरोग्यतपासणी २४ मार्च रोजी करण्यात आली त्याचा शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घेतला.याच धर्तीवर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करून फळ वाटप पदाधिकाऱ्यांनी केले आणि परिसरातील स्वच्छता मोहीम देखील उत्साहाने केली.


या वेळी रविंद्र रोहामारे, शिल्पाताई रोहामरे, प्रशांत कडू, दीपक पंजाबी, अनिल गायकवाड,वाल्मीक मरसाळे, सोमनाथ मस्के, योगेश पगारे, रंजन जाधव, लक्ष्मण भाटे, रोहित कनगरे, रमजात शेख, अनिल मराठे, डॉक्टर वाल्मीक आहिरे, डॉक्टर उल्हारे सर, गलांडे मॅडम,मोहिते मामा आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Pages