सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शेतकी विभागाच्या तीस अधिकारी कर्मचा-यांनी बारामतीत एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस उत्पादनांत हमखास वाढ याबाबतचे घेतले प्रशिक्षण. - Shramik News

Breaking

Wednesday, May 21, 2025

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शेतकी विभागाच्या तीस अधिकारी कर्मचा-यांनी बारामतीत एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उस उत्पादनांत हमखास वाढ याबाबतचे घेतले प्रशिक्षण.


 


कोपरगांव :- माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात शेतक-यांचे अधिक उस उत्पादन वाढावे याबाबत सातत्याने जनजागृती केली, त्याच पावलावर पाउल ठेवत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सभासद शेतक-यांचे उस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रात धडक कार्यक्रम हाती घेवुन त्याबाबत शास्त्रोक्त माहिती देत आहेत, यात आणखी अचुकता यावी म्हणून राज्य सहकारी साखर संघ व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने ए-आय (कृत्रिम बुध्दीमत्ता) प्रशिक्षण शिबीर बारामती येथे नुकतेच आयोजित करण्यांत आले होते त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शेतकी विभागाच्या तीस अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेत प्रशिक्षण घेतले. राज्य सहकारी साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उदघाटन झाले.


             या प्रशिक्षण शिबीरात बारामती कृषि विज्ञान केंद्र मृदा शास्त्रचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईट ए आय तंत्रज्ञान आधारित उस उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले, शेतक-यांना हे तंत्रज्ञान किफायतशीर आणि हमखास उत्पादन वाढीसाठी मदत करते. उसपिकाची वाढ, त्याचे आरोग्य, कीड व रोग प्रार्दुभाव माहिती देण्यासाठी एआय सेन्सर्स व ड्रोनचा वापर करण्यांत येतो. जमीनीची सुपिकता, खत वापर शिफारस, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, लागवड व उस तोडणी, प्लॉटनिहाय उस उत्पादन साखर उतारा आदिबाबत योग्य मार्गदर्शन देत सर्व संकलीत माहिती शेतक-यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळविली जाते असेही ते म्हणाले.


           उस पिकात कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरामुळे पारंपारीक पध्दती पीकापेक्षा फुटव्यांच्या संख्येत वाढ मिळते. उस कांडयांची संख्या व लांबी वाढते, पानांची लांबी- रुंदी वाढते, उसाची जाडी व उंचीत वाढ मिळते या सर्व एकत्रीत बाबींमुळे पाण्यामध्ये ५० टक्के तर खतांमध्ये ३० टक्के बचत होवुन शेतक-यांना हमखास १२० ते १५० मे. टन प्रति एकर उस उत्पादन मिळाल्याचे शेतक-यांचे निष्कर्षाची शेवटी डॉ. विवेक भोईटे यांनी सचित्र माहिती दिली.

Pages