गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु - Shramik News

Breaking

Monday, May 26, 2025

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु


 

कोळपेवाडी वार्ताहर – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्युट मध्ये शासनाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशासाठी मंगळवार (दि.२०) पासून सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.


            गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा यामध्ये सुसज्ज ईमारत, अतिजलद इंटरनेट सुविधा उपलब्ध असून सर्व सोयींनीयुक्त अशी कार्यशाळा, सर्व प्रकारची साधन सामुग्री या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागद पत्रांची पडताळणी, भरलेल्या माहितीत सुधारणा  करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे. या केंद्रातून प्राध्यापक सादिक शेख व जुबेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था व शाखा निवड, विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती मिळणार असल्याचे प्राचार्य सुभाष भारती व ऑफिस सुपरिटेंडेंट आण्णासाहेब बढे यांनी सांगितले आहे. या सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन संस्था निरीक्षक प्रा. नारायण बारे यांनी केले आहे.

Pages