चांदर वस्ती शाळेत मोफत वह्यांचे वाटप - Shramik News

Breaking

Monday, July 14, 2025

चांदर वस्ती शाळेत मोफत वह्यांचे वाटप

कोपरगाव - दि .12/7/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदरवस्ती(खिर्डी गणेश) शाळेत मा. बिपिन दादा कोल्हे पा. सो. अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह यांच्या वाढदिवसानिमित्त प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप मा.चंद्रकांत बाबुराव चांदर सरपंच खिर्डी गणेश यांचे उपस्थितीत मा. प्रदीप भाऊ चांदर पा, मा.साईनाथ रोहोम पा. मा.सुवर्णाताई चांदर पा. ग्राम पंचायत सदस्या,मा.ज्ञानेश्वर भाऊ चांदर पा.मा महेंद्र चांदर पा. मा.कविताताई आढाव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मा.सुवर्णाताई चांदर उपाध्यक्षा, श्री.संतोष भाऊ नेटके पा.श्री.वैभव चांदर पा.श्री.राजाभाऊ अनर्थे, श्री.संदीप फटांगरे, श्री.समाधान हिरे,श्री मच्छिंद्र शेलार  यांचे हस्ते करण्यात आले.

         यावेळी अंगणवाडी ताई छायाताई चांदर पा. निकिता माळी, राहिबाई शेलार,त्याचप्रमाणे पालक व शिक्षक श्री.सोनवणे सर, श्री.सोंजे सर यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वितरण करण्यात आले.

     एक चांगले शैक्षणिक काम दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होते आहे. याबाबत सर्वांचे हार्दिक आभार मानून मा.दादांना शाळा व्यवस्थापन समिती व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Pages