पुन्हा कामावर नियुक्ती मिळावी आणि शासकीय परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी यासाठी श्रमिक मजूर संघाचे पंचायत समितीत उपोषण - Shramik News

Breaking

Thursday, July 31, 2025

पुन्हा कामावर नियुक्ती मिळावी आणि शासकीय परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करावी यासाठी श्रमिक मजूर संघाचे पंचायत समितीत उपोषण


 श्रीरामपुर प्रतिनिधी- शालेय पोषण आहार कर्मचारी यांना विनाकारण कामावरून कमी करू नये, कमी करण्याचे असल्यास त्यांना त्यांची बाजू मांडू द्यावी व ही कारवाई गटशिक्षणाधिकारी यांच्या समोर करावी असा शासनाचा 18/ 12/ 2023 चा जीआर आहे. या जीआर चे उल्लंघन उंदीर गाव सर्कल नंबर सहा येथील जिल्हा परिषद  शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केले आहे. या शाळेतील वैशाली अनिल पंडित यांना विनाकारण कामून कमी करून नवीन नियुक्ती केली आहे. या विरोधात श्रमिक मजूर संघ श्रीरामपूर शाखेच्या वतीने आज पंचायत समिती श्रीरामपूर येथे उपोषण करण्यात आले.याप्रसंगी उपोषणकर्ते वैशाली पंडित यासह  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, राज्य समन्वय कैलास पवार ,राज्य समन्वय उत्तम गायकवाड संघटक किशोर औटी अब्दुल तांबोळी शोभाताई वमने सुनील पंडित ज्योति शिरसागर सुनीता वाघमारे आसमा शहा अनिल पंडित उमेश शिंदे शैला भोसले तेरेजा वाघमारे गायत्री शेळके सविता मोहन कांताबाई राशनकर आशा साठेआदी कर्मचारी उपोषण स्थळी हजर होते. वैशाली पंडित यांना कामावर परत पुन्हा रुजू करून न घेतल्यास आणि संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद अहमदनगर येथे पुढील आठवड्यात आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Pages