दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आत्मा मालिक क्रिकेट ॲकॅडमी मैदानावर महिला चॅम्पियन स्पर्धेची सुरुवात.झाली या स्पर्धेमध्ये दहिसर स्पोर्ट क्रिकेट क्लब दहिसर, मुंबई. अहिल्यानगर इलेव्हन, श्री श्री रविशंकर क्रिकेट क्लब संगमनेर, तसेच सातारा व परभणी येथील क्रिकेट संघ सहभागी झालेले असून वन डे पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जात आहे.या स्पर्धेमध्ये खेळत असलेला दहिसर क्रिकेट क्लब संघाचा हा एकूण 80 वा दौरा असून या संघाच अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले संघाचे व्यवस्थापक प्रवीण गोगरी, संघ कोच रवींद्र बारिया, यांनी इतर महिला खेळाडूंना देखील मार्गदर्शन केले स्पर्धेतील पहिला सामना क्रिकेट क्लब दहिसर व अहिल्यानगर इलेव्हन या संघामध्ये झाला नाणेफेक जिंकून अहिल्यानगर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजीं स्वीकारली निर्धारित 40 षटकांमध्ये सर्व बाद 155 धावसंख्या अहिल्यानगर संघाने उभारली तर दहिसर संघाची गोलंदाज प्रियंका गोलीपकर हिने आठ षटकात वीस धावा देऊन 6 गडी बाद केले 156 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या दहिसर संघाने 30.1 शतकामध्ये दोन गडी गमावत लक्ष पार केले व आठ गडी राखून विजय मिळवला ,सामन्यात नगर संघाची अपूर्वा रोकडे येणे नाबाद 55 धावा बनवल्या, तर दहिसर संघातर्फे राधिका जोशी ने 43 व श्रेया पठाडे यांना 74 धावा बनवले. 6 गडी बाद करणाऱ्या प्रियंकास प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तर स्पर्धेतील दुसरा सामना श्री श्री रविशंकर संगमनेर व दहिसर स्पोर्ट्स मुंबई या संघात झाला नाणेफेक जिंकून श्री रविशंकर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली व निर्धारित 40 षटकांमध्ये बास बाद १४५ धावांचं लक्ष दहिसर संघास दिले रविशंकर संघाव तर्फे आदिती राऊतने 16 शिवानी लोखंडेेणे 30 देवकरीने 32 संस्कृती गायकवाड ने 13 देवकरीने 32 , वैदेही बोडकेना दोन तर संचिता लिंगायतने नाबाद 18 धावा बनवले. 145 धावांची विजयी धावांचं लक्ष घेऊन उतरलेल्या दहीसर संघाने 25.5 षटकामध्ये चार बाद 150 धावा काढून सहा गड्यांनी विजय मिळवला या सामन्यामध्ये 72 धावा काढणारी स्नेहा प्लेअर ऑफ द मॅच ठरली.तर स्पर्धेतील पुढचा सामना एसएमएस क्रिकेट अकॅडमी ओडूपी कर्नाटक व अहिल्यानगर इलेव्हनध्ये झाला निर्धारित 25 षटकात शमे संघाने पाच बाद 133 धावा बनवल्या 134 धावांचं एक लक्ष घेऊन उतरलेला अहिल्यानगर संघ निर्धारित 25 षटकांमध्ये पाच बाद 115 धावा बनू शकला कर्नाटक संघाने हा सामना 18 धावांनी जिंकला सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लक्ष्मी बी इस सामना वीर म्हणून गौरविण्यात आले.
तसेच सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर चा सामना एसएमएस क्रिकेट अकॅडमी कर्नाटक व दहिसर स्पोर्ट यांच्यामध्ये झाला नाणेफेक जिंकून दहिफळे सर संघाने कर्नाटक संघास फलंदाजीसाठी प्राचारण केले तेव्हा कर्नाटक संघ 22.2 षटकांमध्ये सर्व बाद 54 धावाचकरू शकला 55 धावांचं विजयी लक्ष घेऊन उतरलेला दहिसर संघाने 12.5 षटकामध्ये चार गाड्यांच्या मोबदल्यात लक्ष पार केले व एकतर्फी विजय मिळवला सात गडी बात करणाऱ्या प्रिया मिसाळ हिला सामनावे म्हणून गौरवण्यात आले पंच म्हणून जळगावचे प्रवीण इंगोले ,सुरज जाधव, कोपरगावचे विजय चिने, राहुल रोकडे प्रशांत शर्मा अक्षय नागरे यांनी काम पाहिले दिवस रात्र पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जात असून 25 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल