नेवासा प्रतिनिधी - सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शाखा नेवासा यांच्या वतीने आमदार शंकर गडाख यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.शासन स्तरावर आमच्या समस्या मांडून त्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली. शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या लढ्यात मी नेहमी सोबत आहे असे आमदार शंकर गडाख यांनी सांगितले.यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक तथा तालुका अध्यक्ष कैलास पवार,राज्य समन्वयक तथा तालुका उपाध्यक्ष उत्तम गायकवाड ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाबासाहेब गोर्डे,जिल्हा उपाध्यक्षा छाया भूमकर,सोनकांबळे,नाईक ,वाघ ,काटे मावशी आदि कर्मचारी हजर होते.
Thursday, October 10, 2024
