महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी तीन खासदारासमवेत भरला उमेदवारी अर्ज - Shramik News

Breaking

Tuesday, October 29, 2024

महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्पे यांनी तीन खासदारासमवेत भरला उमेदवारी अर्ज


 कोपरगाव प्रतिनिधी (२९ ऑक्टोंबर)-  विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी आज संपत असतानाच विविध  उमेदवारांनी  पक्षांच्या वतीने आपले अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अंतिम उमेदवार यादी जाहीर केले असता कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी संदीप गोरखनाथ वर्पे यांना देण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दक्षिण नगर मतदार संघाचे खासदार निलेश लंके, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थित निवडणूक अधिकारी सायली सोळंके यांच्याकडे संदीप वर्पे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

दरम्यान कोपरगाव विधानसभा निवडणुकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खास लक्ष असल्याची माहिती असून त्यासाठी त्यांनी आज महाआघाडीचे खासदार भावसभा चौरे खासदार निलेश लंके खासदार भास्कर भगरे यांना जाणीवपूर्वक पाठवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही निवडणूक राज्यात महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे. याप्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र झावरे संजय सातभाई काँग्रेस प्रदेश सचिव नितीन शिंदे उभा ठाक सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव शहराध्यक्ष सनी वाघ माजी शहर प्रमुख भरत मोरे कलविंदर गडियाल दीपक साळुंखे असलम शेख माजी तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे सिद्धार्थ चांदगुडे योगेश बागुल माजी तालुका उपप्रमुख गंगाधर राहणे राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख बापू रांजवणे किरण खरडे प्रवीण पोटे व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.धन शक्ती विरूध्द जन शक्ती अशी ही लढत होईल आणि या वेळेस तिसराच आमदार द्यायचा अशी तालुक्यातील आणि शहरातील मतदारांची चर्चा सुध्दा एकायला मिळत आहे.शेवटी माघारीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Pages