कोपरगाव प्रतिनिधी - दिवाळी सणानिमित्त आज लक्ष्मी पुजन प्रत्येक घरात आणि दुकानात व कार्यालयात केले जाते..या रिवाजाप्रमाणे आज अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा कोपरगाव येथे संचालक शशिकांत जेजुरकर,विकास मंडळाचे माजी विश्वस्त रमेश दरेकर गुरुमाउली सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर निकुंभ व जेष्ठ कवयित्री चंदन ढूमने,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष किरण निंबाळकर ,महेंद्र निकम या सर्वांच्या उपस्थित लक्ष्मी पुजन करण्यात आले.या वेळी कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी जाकीर शेख,अनिल लकारे,अरुण गोर्डे ,धनंजय देसाई आदि बँकेचे कर्मचारी हजार होते.
.