आशुतोषदादांना पाठिंबा देण्यासाठी उसळला जनसागर ! - Shramik News

Breaking

Friday, October 25, 2024

आशुतोषदादांना पाठिंबा देण्यासाठी उसळला जनसागर !


कोपरगाव  प्रतिनिधी -  महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी कोपरगाव मतदारसंघातुन महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


यावेळी महापुरुषांना अभिवादन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत सिनेअभिनेते मा.श्री. सयाजीराव शिंदे यांनी उपस्थित राहून कोपरगावकरांचा उत्साह वाढवला.



यावेळी माजी आमदार अशोकदादा काळे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे, महानंदाचे माजी चेअरमन मा.श्री. राजेशआबा परजणे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री. काकासाहेब कोयटे, राजेंद्रबापू जाधव, अशोकअण्णा रोहमारे, माजी नगराध्यक्ष मा.श्री. विजयराव वहाडणे, पद्माकांतजी कुदळे, कारभारीनाना आगवण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. कपिलजी पवार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, माजी नगरसेवक हाजी मेहमूदभाई सय्यद, विजयजी त्रिभुवन आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages