म्म्हाविकास आघाडीकडून संदीप वर्पे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून उमेदवारी - Shramik News

Breaking

Friday, October 25, 2024

म्म्हाविकास आघाडीकडून संदीप वर्पे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून उमेदवारी


 कोपरगाव  : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर होत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यंदा पारंपारिक काळे विरुद्ध कोल्हे लढत होणार नसून महायुतीकडून अजितदादा गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात कोपरगावच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती, परंतु गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये कोपरगावच्या जागेवर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पहिल्यांदाच होणार आहे. एकीकडे आशुतोष काळे आणि भाजपचे कोल्हे कुटुंबीय दोन्ही मातब्बर नेते एकत्र असून त्यांच्यापुढे महाविकास आघाडीचा उमेदवार कशी टक्कर देणार? याकडे कोपरगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Pages