कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत सामाजिक बांधिलकी जपत सदैव मतदारांच्या सकारात्मक विकासासाठी उमेदवार शिवाजी पोपटराव कवडे यांनी मोटारसायकल वरून,,पायी चालत जाऊन प्रचारासाठी सुरूवात केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ लोकशाहीत आणण्यासाठी, परीवर्तन पारदर्शकता निर्माण करण्यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील रस्ते पक्के करण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचे सांगितले.
हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहीला आहे. फक्त विकासाच्या भुलथापा खोटेपणाचे आश्वासन देऊन रोजगारापासून चक्क मतदारसंघ वंचित ठेवला आहे. याला कारणीभूत कोण आहे, हे मतदारांनी शोधून 20 नोव्हेंबर ला मतदानातून 23 नोव्हेंबर ला लोकशाहीत जीवन जगण्यासाठी सामान्य कार्यकर्ता म्हणून मला निवडुण द्या मला 5 वर्ष करीता संधी द्या या संधीचा विकास पुर्ण करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे आवाहन त्यांनी केले आहे.