अकोले प्रतिनिधी -अकोले जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा उंच खडक बुद्रुक येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सागर शिंदे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना उपदेश करताना संविधानाचे महत्त्व आणि संविधान तयार करण्या कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची मिरवणूक मोठ्या उत्साहात करण्यात आली. संविधानाची प्रस्तावना प्रत्येक मुलाला देण्यात आली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी संविधानाविषयी माहिती मुलांना दिली. संविधानात संविधान म्हणजे काय संविधानातील परिशिष्टे संविधानातील कलमे संविधानासाठी केलेली कष्ट आणि संविधान देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्दिष्ट या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केली. यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य भाऊसाहेब देशमुख, शितल देशमुख,हर्षदा देशमुख. मंजुषा देशमुख, मनीषा सागर देशमुख उपस्थित होते. आलेल्या सर्वांना स्वागत व आभार श्री देवदास गिरहे यांनी मानले.