श्रमिक न्युज सौ सविता विधाते संपादिका 14 डिसेंबर 2024
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील माध्यमिक विद्यालयात नुकताच नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्काऊट कॅम्प आयोजित करण्यात आला. या कॅम्पचे उद्घाटन जगदंबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री भीमराज सोनवणे यांनी केले. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. निवृत्ती बनकर. सचिव श्री.जगन आहेर, सहसचिव सचिन सोनवणे, श्री संजय वाकचौरे श्री बाळासाहेब आहेर श्री बाळासाहेब गंगावणे मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी मुलांनी आपापल्या कॅम्प परिसरातील सजावट केली पाना फुलांनी आपापले तंबू सजविले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी मुलांनी स्वतः पाहुण्यांसाठी चहा नाश्ता बनवून दिला. सर्व संघांना त्यांनी रोख रकमेचे पारितोषिक दिले.
या स्काऊट कॅम्प च्या आयोजनासाठी विद्यालयाचे शिक्षक श्री संतोष तांदळे, श्री राजपूत सर तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.